बागकाम
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.

Go down
avatar
Admin
Admin
Posts : 5
Join date : 2019-04-19
https://garden.forumotion.com

भाजीपाला बागेची लागवड व निगा  Empty भाजीपाला बागेची लागवड व निगा

Fri Apr 19, 2019 8:21 pm
भाज्यांचे ३ हंगामात वर्गीकरण करण्यात येते.
1.पावसाळी किंवा खरीप हंगाम - जून ते सप्टेंबर - सर्व पालेभाज्या, वाटाणा, श्रावण घेवडा, वाल, चवळी, तांबडा भोपळा, दुधीभोपळा, दोडका, पडवळ, कारली, गवार, घोसाळी, वांगी, टोमेटो, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, मुळा, गाजर, बटाटा
2.हिवाळी किंवा रब्बी हंगाम - ऑक्टोबर ते जानेवारी - कोबी, फ्लॉवर, नवलकोल, गाजर, पालक, टोमेटो, कोथिंबीर, मेथी, चाकवत, कांदा, लसूण, वाटाणा, मुळा, भेंडी, बटाटा
3.उन्हाळी हंगाम - फेब्रुवारी ते जून - भेंडी, गवार, कांदा, गाजर, मुळा, वांगी, मिरची, टोमेटो, घेवडा, दुधीभोपळा, तांबडा भोपळा, कारली, दोडका, काकडी, पालक, मेथी, कोथिंबीर, ढेमसे

काही भाज्यांची लागवड रोपे तयार झाल्यावर कायम जागी स्थानांतरीत (transplant) करून केली जाते. साधारणपणे अश्या भाज्यांचे बी खूप बारीक असते उदा. वांगी, टोमेटो, मिरची, कांदा, कोबी, फ्लॉवर, मुळा, नवलकोल.

पालेभाज्यांचे बी ओळीने पातळ पेरावे. कोथिंबीर बी पेरण्यापूर्वी १२ तास पाण्यात भिजवावे, नंतर काढून १२ तास उबदार जागेत ठेवावे म्हणजे उगवण चांगली व लवकर होते. पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची वरचेवर खुडणी करून बरेच दिवस पीक घेता येते. एका वाफ्यातून पालेभाजी संपूर्ण काढून घेतल्यावर परत खणून ८-१० दिवसांनी पुन्हा पालेभाजी घेता येईल. अशा वेळी मेथीशिवाय कोणत्याही प्रकारची भाजी काढून घेतल्यावर तेथे मेथी घ्यावी. मेथीच्या मुळावर हवेतील नायट्रोजन शोसून घेण्याच्या गाठी येत असल्याने जमिनीचा पोस सुधारण्याच्या कामी फार चांगला उपयोग होतो.
Back to top
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum