बागकाम
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.

Go down
avatar
Admin
Admin
Posts : 5
Join date : 2019-04-19
https://garden.forumotion.com

मुळा (Radish) लागवड Empty मुळा (Radish) लागवड

Fri Apr 19, 2019 8:24 pm
मुळा थंड हवामानातील पीक असून त्याची लागवड मुख्यत: रब्बी हंगामात केली जाते पण वर्षभर सुद्धा पीक घेता येते. मुळ्याची वाढ जमिनीत होते . त्याच्या पाचक व सारक गुणामुळे पचनशक्ती वाढते व हिरव्या पानात अ आणि क जीवनसत्व असते. मुळ्याचे पीक थंड हवामानातील असून त्याची वाढ २० ते २५ अंश सेल्शियस तापमानात जलद होते. जमीन भुसभुशीत, रेताड व खोल असावी. बी तपकिरी फिकट रंगाचे असते व १५-२० से.मी. अंतरावर पेरावे. हिवाळ्यात ८-१० दिवसाने व उन्हाळी हंगामात ४-५ दिवसांच्या अंतराने पाणी देणे. नेहमी ओलसरपणा कायम राहील एवढे पाणी देत गेले पाहिजे. मुळ्यावर कीड पडल्यास चाळलेली राख फेकावी . खोडाजवळ मातीची भर घ्यावी . मुळा ४० ते ५० दिवसात काढणीस तयार होतात व काढण्यापूर्वी पाणी द्यावे व हाताने मुळे तुटणार नाहीत याची काळजी घेवून उपटावे.
Back to top
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum